रायगड: माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूपी) सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार आहेत. पंडित पाटील हे भाजपमध्ये एकटे प्रवेश करणार नसून त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजप पक्षात प्रवेश करणार आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेशनंतर रायगड येथील त्यांच्या लक्षणीय कार्यकर्त्यांचा भाजपला मोठा फायदा होईल, विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील यांचे रायगड मध्ये किती वर्चस्व आहे ते दिसून येणार असून भाजपला त्याचा फायदा होणार आहे.
पंडित पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे बळ आणखी वाढणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंडित पाटील भाजपमध्ये सामील होणार आहेत.