शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेला अखेर सुरुवात करणात आल्याने ग्रामस्थांना लवकरच शुद्ध पाणी मिळणार आहे.
पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी जल जीवन मिशन योजना मंजूर झालेली असताना सदर योजनेतील कामाला नुकतीच पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दत्तात्रय वारे, सरपंच निलेश उमाप यांच्या हस्ते गावातील सर्व जेष्ठ व्यक्ती व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या योजनेतील कामांचे भूमिपूजन झाले.
सदर योजनेतून स्मशानभूमी शेजारी जुन्या बैलगाडा घाटात जल जीवन मिशन योजनेच्या पाणी साठ्यासाठी पाणी साठवण तलाव बांधण्यात येत असून येथे चासकमान कालव्याचे पाणी साठवण करुन गावामध्ये जल शुद्धीकरण प्रकल्प उभारुन नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात येणार असल्याने नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहेत.