हडपसर: 38 वर्षीय टेक प्रोफेशनलला ऑनलाइन शेअर ट्रेडिंग करणे चांगलेच महागात पडले आहे. टेक प्रोफेशन एका ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळ्याचा बळी पडला आहे. या ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीमध्ये त्या व्यक्तीला ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान जवळपास ४५.४० लाख रुपये गमावावे लागले आहे. सुरवातील चांगला नफा मिळत असल्याने फिर्यादी व्यक्तीने ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक पैसे गुंतवणूक केले. परंतु नंतर ऑनलाइन शेअर ट्रेडिंग कंपनी फसवणूक करत असल्याचे फिर्यादीला समजले.
सुरवातीला फिर्यादीला एका ग्रुपमध्ये जोडण्यात आले तिथे अनेकांनी ग्रुप अॅडमिनच्या टिप्समुळे फायदेशीर ट्रेडिंग नफ्याचे अनुभव शेअर केले होते. हि दिशाभूल लक्षात न आल्याने पिडीतेने आयुष्य भराची कमाई जास्त नफ्यासाठी पणाला लावली. परंतु अखेर व्हायचे तेच झाले आणि पिडीतेची फसवणूक झाली. सुरुवातीला कमी किमतीचे शेअर्स खरेदी करून सुरुवात करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने त्याला अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले, सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला आणि त्या बदल्यात उच्च परतावा देण्याचे आश्वासन दिले. पीडितेने शेवटी ४५.४० लाख रुपये ट्रान्सफर केले, त्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीतेने हडपसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.