सासवड(पुणे): जेजुरी मार्गाने एम एच बारा डब्ल्यू झेड 9246 या नंबरची इर्टीका गाडी गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन बोपदेव मार्गे पुण्याला जात असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली. त्यानंतर अॉस्करवाडी येथे नाकाबंदी करून गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू ही मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, या विषयी खात्रीशीर बातमी मिळताच, पोलीस हवालदार जब्बार सय्यद, गणेश पोटे यांनी भिवरी या ठिकाणी अॉस्करवाडी येथे नाकाबंदी करून, एम एच बारा डब्ल्यू झेड 9246 ही गाडी थांबवून गाडीची पाहणी केली. त्यानंतर गाडीमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू ही मिळून आली. गाडी चालकाचे नाव ईश्वर बळवंत पाटील(वय 43, रा. एच विंग प्लॅट नंबर 402, आकृती हाऊसिंग सोसायटी, टिळेकर नगर कोंढवा पुणे ) असे आहे.
गाडीमध्ये 99 हजार 814 रुपयांचा केसर युक्त विमल पान मसाला, गुटका व सुगंधित तंबाखू तसेच 12 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती इर्टीका गाडी अशी एकूण 12 लाख 99 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जब्बार सय्यद हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज नांगरे, लियाकतअली मुजावर, जब्बार सय्यद, गणेश पोटे, अक्षय चिल्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली.