मंगळवार पेठ (पुणे): पुण्यात स्क्रॅम्प व्हेंडर असलेल्या व्यावसायिकाला शेअर ट्रेडिंग, आयपीएल सट्टेबाजी आणि रेसकोर्स व्यवसायात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी २ लाख रुपये गुंतवणूक करायला सांगितले. डिसेंबर २०२४ पर्यंत ३२ लाख रुपये नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण १९.८० लाख रुपये गुंतवणूक केली. दरम्यान, नंतर ३२ लाख रुपये नफा देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी फसवणूक केली. सुरवातील चांगला नफा दिल्यानंतर आरोपींनी उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीला कळाले. व्यावसायिकाला फक्त ६ लाख रुपये परत देण्यात आले असून उर्वरित रक्कम आरोपींनी दिली नसल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे. फिर्यादीची १५.७० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन महिला आणि दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पल्लवी गोसावी, किरण गोसावी, अर्शद शेख आणि प्रसाद कांबळे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी व्यावसायिकाला १२ लाख रुपयांचा चेक दिला, जो बँकेत दिल्यानंतर बाउन्स झाला. वारंवार विनंती करूनही आरोपी पैसे परत करत नव्हते आणि पैसे देण्याचे खोटे आश्वासन देत होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. व्यावसायिकाने आरोप केला आहे की, फिर्यादी यांच्याबरोबरच मंगळवार पेठेतील एका महिलेची २ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण १५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.