शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई रुपाली बाळासाहेब निंभोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दोन महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यांनतर सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, महिला पोलीस शिपाई रुपाली निंभोरे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चाकण चौकातील कृष्णा लॉजिंग समोर दोन महिला नागरिकांना अश्लील हावभाव करताना आढळून आल्या.