भिगवण : एक लाख १७ हजार रुपयांचे दरमहा २० टक्के व्याजाने घेतलेल्या पैशाचे तीन लाख ८९ हजार रुपये देऊनही अधिकच्या रकमेची मागणी करुन फिर्यादीला शिवीगाळ केली. याप्रकरणी भिगवण मधील दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रेम जगताप, रेश्मा जगताप (रा. भिगवण, ता. इंदापुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिपाली गायकवाड (रा. राजेगाव ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रेम जगताप व रेश्मा जगताप यांनी गायकवाड यांना एक लाख १७ हजार रुपये वीस टक्के व्याजाने दिले होते. त्या बदल्यात फिर्यादीने एक लाख ४९ हजार ऑनलाईन , तर दोन लाख ४० हजार रोख स्वरूपात असे एकूण तीन लाख ८९ हजार रुपयांची परतफेड केली होती. मात्र एवढे पैसे देऊनही सहा लाख ८० हजार रुपयांची मागणी करत होते.