शिक्रापूर: गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याने एकास बेदम मारहाण केली. याबाबत आण्णा बाळू मदणे (वय २६ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सागर जगधने (रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहत येथून बिडवे कंपनी समोरून आण्णा मदणे हा युवक त्याच्या ताब्यातील दुचाकीहून चाललेला असताना पाठीमागून दुचाकीहून आलेल्या सागर जगधने याने आण्णा याच्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर आण्णा याने कट का मारला? असे विचारले असता सागरसह त्याच्या दोन साथीदारांनी आण्णा यास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार तेजस रासकर हे करत आहेत.