पुणे : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असेलल्या पोलीस उपनिरीक्षकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. लोणावळा येथे झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते. गेले तीन दिवसापासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज मात्र गुंजाळ यांनी लोणावळा येथे झाडाला गळफास घेतल्याची माहिती लोणावळा पोलीसांनी खडकी पोलिसांना दिली. गुंजाळ यांनी आत्महत्या का केली? याबाबत मात्र अद्याप काही समजू शकेलेले नाही.