पुणे: तनिषा भिसे या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप करण्यात आले आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत तीन अहवाल प्राप्त झाले आहेत. राज्यशासनाचा, धर्मदाय आयुक्तांचा आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचा या तिन्हीचे अहवाल समोर आले आहेत. ससून रुग्णालयातील नेमलेल्या समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयाच्या समितीकडून तनिषा यांचा मृत्यू प्रकरणात काय घडले, या सगळ्याचा तपास केला जात आहे. या अहवालात काय नेमकं पुढे येणार याची प्रतीक्षा आहे. ससून रुग्णालयाने स्थापन केलेली समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच त्यांचा अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे. अहवालात रुग्णाच्या मृत्यूमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा करण्यात आला होता का हे स्पष्ट होऊ शकते. आज दुपार पर्यंत हा अहवाल येणार आहे. दरम्यान, ससूनच्या अहवालात वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मंगेशकर रुग्णालयावर थकीत कर
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर थकीत कर आणि वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपांमुळे अधिकाऱ्यांकडून कारवाईची शक्यता आहे. रुग्णालयावर 27 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकल्याचा आरोप आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने थकीत कर भरण्याची मागणी करणारी नोटीस बजावली आहे. कर थकबाकी आणि संभाव्य कारवाई पुणे महानगरपालिकेने रुग्णालयाला इशारा दिला आहे की, थकीत कर रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास पुढील कारवाई केली जाईल. महानगरपालिकेने यापूर्वी 7 एप्रिल रोजी रुग्णालयाला नोटीस बजावली होती, ज्यामध्ये थकीत कर भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. ससून रुग्णालय समितीच्या चौकशीचे निकाल आणि रुग्णालयावर असलेला कर भरणा या वरून पुढील कारवाई निश्चित होईल.