शिक्रापूर : कोंढापुरी (ता. शिरूर) गावचे पोलीस पाटील राजेश गायकवाड हे गावातील वीरसाहेब मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराच्या सभामंडपामध्ये एक अनोळखी झोपल्यांचे दिसून आल्याने त्यांनी त्या इसमाजवळ जाऊन पाहणी केली. सदर इसमाची कोणती हालचाल होत नसून तो मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदर इसमा बाबत गावात चौकशी केली असता काही माहिती मिळू शकली नाही.
याबाबत पोलीस पाटील राजेश प्रकाश गायकवाड (वय ५० रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सदर इसमाचे वय अंदाजे ५० वर्षे, रंगाने काळा, थोडे टक्कल, दाढी मिशा पांढरी व वाढलेली, अंगामध्ये निळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. सदर इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहेत.