सुरेश घाडगे
परंडा: ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे असुन परंडा येथील अनेकजण रडारवर आहेत . अशी माहिती माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा येथे शुक्रवार (दि.25) पत्रकार परिषदेत दिली.
परंडा व तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीबाबत भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, ड्रग्ज तस्करीची वस्तुस्थिती व भीषण वास्तव यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले.
ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असुन माजी आ. ठाकूर यांनी त्यानंतर सोलापुर व धाराशिव पोलीस अधिक्षक यांना संपर्क साधला. माजी आ. ठाकूर यांनी तुळजापूर व परंडा या दोन्ही ठीकाणी दाखल ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातले असुन पाठपुरावा सुरु केला आहे.
बार्शी ड्रग्ज तस्करीत 10 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 8 जण परंडा येथील तर 2 जण बार्शी येथील आहेत. बार्शी पोलीसांनी 7 जणांना अटक केली असुन 3 आरोपी फरार आहेत. ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे असुन परंडा येथील अनेकजण रडारवर आहेत. तुळजापूर येथे 36 आरोपी निष्पन्न झाले असुन 14 जण अटकेत आहेत तर 22 जण फरार आहेत.
ड्रग्ज तस्करीमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असुन तस्करावर कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी व भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे उपस्थित होते.