लोणावळा, महाराष्ट्र – लोणावळा येथील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ मानसी प्रशांत गोविंदपूरकर या 21 वर्षीय तरुणीच मृतदेह आढळून आला आहे. १८ मार्चपासून मानसी बेपत्ता होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मानसीचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या वेळेस लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडत तिचा मृतदेह आढळून आला आहे. नवग्रह मंदिराजवळील झुडुपात तिचा मृतदेह आढळ्याचा शिवदुर्ग बचाव पथकाकडून फोन आला होता. तपासात मानसी किल्ल्यावर एकटी गेल्याचे किल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
सांगवी येथून तरुणी कॉलेजला जाते म्हणून मंगळवारी घरातून पडली होती. दरम्यान, घरी न परतल्यामुळे घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिस तपासात मानसीचे शेवटचे लोकेशन लोहगड किल्ला परिसरात दिसून आले होते, जिथे मानसी 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता टॅक्सीने एकटीच जात्ताना दिसून आली आहे. लोहगड किल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती काउंटरवर तिकीट खरेदी करताना दिसून आली आहे. दरम्यान, मानसीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिस मानसीचा मृत्यू किल्ल्यावरून पडून झाला कि गैरप्रकारामुळे हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून साक्षीदारांचीही चौकशी केली जात आहे.