पुणे : राज्यात नवे जिल्हा निर्मिती होणार आहेत असं सर्वत्र समाज माध्यमांवर पाहायला मिळत होतं. मात्र यावर आता ‘राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा होणार नाही. तसा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. या केवळ अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती येथे दिले आहे. राज्यामध्ये नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे अशी चर्चा प्रसारमाध्यमातून होत आहे.
अधिक माहिती अशी की, समाजमाध्यमांवर नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत मोठ्या प्रमाणात बोललं जात होतं. मात्र आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील टेंभुर्णी येथील एका खासगी कार्यक्रमासाठी गेले असता, तेथे पत्रकारांनी नवीन जिल्ह्याच्या संदर्भात विचारले असता या केवळ अफवा आहेत यामध्ये काहीही तथ्य नाही असे सांगितले.