मुंबई, दि. 6: अतिवृष्टी, पूर, अवकळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी/पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस 2022-2023, व 2023-2024, अवेळी पाऊस/अतिवृष्टी 2023-2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना 99 लाख 62 हजार 37 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपये, सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार 145 लाभर्थ्यांना 35 कोटी 63 लाख 745 रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.