लोणी काळभोर : जेवणाचा डबा आणण्यासाठी चालेल्या विद्यार्थिनींच्यासमोर अश्लील हावभाव करून हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता.20) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत अटक केली आहे.
रणजीत सुधाकर विभुते (वय २६, रा. रमणबाग सोसायटी, नायगाव रोड, कुंजीरवाडी ता. हवेली दि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे. याप्रकरणी 20 वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोणी काळभोर परिसरातील एका बड्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. तर त्या कदमवाकवस्ती परिसरातील एका वसतिगृहात राहतात. विद्यार्थिनीने त्याच परिसरात जेवणाची खानावळ लावली आहे.
दरम्यान, विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा आणण्यासाठी सोमवारी (ता.20) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चालल्या होत्या. तेव्हा आरोपी विभुते याने विद्यार्थिनींकडे पाहून पॅन्ट खाली घेवुन हस्तमैथुन करू लागला. तसेच अश्लील हावभाव करीत विद्यार्थिनींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल त्या दृष्टीने कृत्य करू लागला. त्यानंतर आरोपी घाणेरडे शब्दोच्चार करुन विद्यार्थिनींच्या अंगावर धावू लागला. व विद्यार्थिनींचा पाठलाग करून विनयभंग केला.
याप्रकरणी विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विभुते यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 74,75,78, 79, 296 (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला एका तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, आरोपी रणजीत विभुते याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक कलम 279, 337 यांच्यासह मोटर वाहन कायद्यान्वये सन 2019 साली गुन्हा दाखल आहे. आरोपी रणजीत विभुते याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडीत रिमांड सुनावली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलिस हवालदार योगेश कुंभार, तेजस जगदाळे, पोलिस अंमलदार अजिंक्य जोजारे व तुकाराम येडे यांच्या पथकाने केली आहे.