लोणी काळभोर, (पुणे): थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किशोर शंकर उंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आज रविवारी (ता. 09) पार पडली.
कारखान्याचे उपाध्यक्ष मोरेश्वर काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत किशोर उंद्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने जगताप यांनी ‘यशवंत’च्या उपाध्यक्षपदी किशोर उंद्रे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
या वेळी माजी सभापती प्रताप गायकवाड, संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनील सुभाष कांचन, सुशांत सुनील दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, रामदास सीताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगताप, हेमा मिलिंद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर, दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जुन थोरात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद काळभोर, आदी उपस्थित होते. तर सागर अशोक काळभोर, श्यामराव सोपाना कोतवाल व नवनाथ तुकाराम काकडे हे अनुपस्थित होते.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, संचालक प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, लक्ष्मण केसकर, आदी उपस्थित होते.