अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: एस.टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ४५ हजार ५०० रु.चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा आत्माराम लोंढे (वय ६० वर्ष, व्यवसाय, घरकाम रा. वाडाकॉलनी, शिरुर, ता. शिरुर जि. पुणे) यांचे दागिने चोरटयांनी प्रवासादरम्यान चोरले आहेत. या प्रकरणी शोभा लोंढे यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. २६फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते पावणेचार वाजेच्या दरम्यान केडगाव चौफुला ते शिरुर प्रितमप्रकाश नगर, दरम्यान शिरुर-चौफुला एस टी बस नं एम. एच.४० वाय- ५८१४ मध्ये घडली. लोंढे यांनी कंडक्टर शेजारी बसलेल्या शिटखाली ठेवलेल्या बॅगमधुन अज्ञात चोरट्याने दागिने चोरी करुन नेले आहेत.
११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, नाकातील १ ग्रॅमच्या दोन नथ, १८ ग्रॅम वजनाच्या ३ हातातील ५ अंगठ्या, १३ ग्रॅम वजानाचे गळ्यातील हाफ गंठण, चांदीचे पैजन, छल्ला, मासोळ्या व जोडवे, दहा हजार रु रोख रक्कम असा 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.
यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत करत आहेत .