लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथे एका 20 वर्षीय मजुराने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.17) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सोनुने आत्महत्या का केली याचा करण अद्याप समोर आलेले नाही.
सोनू उर्फ प्रसाद संजय मोरे (वय 20, सध्या रा. थेऊर, ता. हवेली मूळ रा. कवठे महाकाळ सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू मोरे हा कुंजीरवाडी परिसराततील भाजीपाला केंद्रात मजूर म्हणून काम करीत होता. तर सोनू मोरे हा थेऊर कारखाना रस्त्यावरील खंडू नामदेव गावडे यांच्या निसर्ग सोसायटीच्या खोलीत भाड्याने मागील पाच महिन्यांपासून राहत आहे.
दरम्यान, सोनू मोरे याला त्याच्या आईने गुरुवारी (ता.16) फोन केला होता. मात्र त्यांने फोन उचलला नव्हता. त्यानंतर सोनूच्या आईने पुन्हा आज शुक्रवारी (ता.17) फोन केले. मात्र आजही त्याने फोन उचलले नाही. सोनूच्या आईने सोनू काम करीत असलेल्या भाजीपाला केंद्रात फोन करून विचारणा केली. तेव्हा सोनू काल गुरुवारपासून कामावर आला नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोनुच्या आईने त्याचा मित्र किरण मेमाणे यांना फोन केला व सोनू घरी आहे. का नाही ते पाहण्यासाठी सांगितले. त्यानुसार किरण मेमाणे व जीवन पांचाळ हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोनूच्या घरी गेला. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जीवन पांचाळ याने या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार संतोष होले, पोलीस अंमलदार वसंत चव्हाण व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सोनू आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सोनुला खाली उतरवून परिसरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोनूचा मृत्यू हा उपचारापूर्वीच झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी सोनूचा मृत्यूदेह ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. सोनुने आत्महत्या का केली? याचे करण अद्याप समोर आले नसले तरी त्या दुष्टीकोनातून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.