कोलकाता : ‘हर एक फ्रेंड जरूरी होता…’ हे गाणे तुम्ही ऐकले असेलच, इतरही काही ओळी आहेत, ज्या आपण इथे लिहू शकत नाही. पण मित्रांसाठीचे खरे वर्णन हेच आहे. मित्र अडचणीत पाठीमागे उभे असतात आणि तुम्हालाही अडचणीत टाकतात. मित्रमैत्रिणींची मस्ती करतानाचे खरे उदाहरण पाहायचे असेल तर सध्या व्हायरल होत असलेला फोटो पाहा. हा फोटो रस्त्याच्या कडेला लावलेल्या होर्डिंगचा आहे. या होर्डिंगमध्ये मुलासाठी गर्लफ्रेंड शोधण्याबाबत लिहिले आहे. ते होर्डिंग त्या मुलाच्या मैत्रिणीने लावले आहे.
इन्स्टाग्राम अकाउंट @ig_calcutta वर कोलकाता शहराशी संबंधित मनोरंजक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. नुकताच एक मजेदार व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एका मुलासाठी जाहिरात दिली आहे. रिओ असे या मुलाचे नाव असून त्याच्यासाठी मैत्रीण शोधण्याची जबाबदारी त्याची जिवलग मैत्रीण आंचलने उचलली आहे. आंचलने रस्त्याच्या कडेला एक मोठे होर्डिंग लावले आहे, ज्यामध्ये ती रिओसाठी गर्लफ्रेंड शोधत असल्याचे लिहिले आहे.
गर्लफ्रेंड शोधण्यासाठी लावले होर्डिंग्ज :
होर्डिंग्जमध्ये रिओचा फोटो लावण्यात आला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आंचलने लिहिले आहे की, रिओला शहरातील सर्वोत्तम गोलगप्पा दुकानाची माहिती आहे. तसेच, तो एक चांगला छायाचित्रकार आहे, म्हणून जो कोणी त्याची मैत्रीण होईल, तिचे असंख्य स्पष्ट फोटो काढले जातील. याशिवाय तो पार्क स्ट्रीटमध्ये मिळणाऱ्या काठी रोल्सप्रमाणे तोही रोल्स बनवतो.रिओच्या टिंडर खात्याचा क्यूआर कोडही होर्डिंगमध्ये टाकला आहे.
View this post on Instagram
या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट
या पोस्टला 3 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटले आहे की, रिओ आयलंड युनिव्हर्सिटी, कोलकाता येथे शिकतो. तर एकाने सांगितले की ही टिंडरची जाहिरात आहे. अनेक लोक कमेंटमध्ये रिओ शोधत आहेत.