दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही समाजहित आणि जनहितास प्राधान्य देऊन काम करणाऱ्या नायकांचा, वीरांचा मान राखण्यासाठी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीमध्ये दिले जातात. या वर्षी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ. नीरजा भाटला, अॅथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर होमिओपॅथी चिकिस्तक डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, पुद्दुचेरी येथील धविल वादक पी. दत्चनमूर्ती, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, नागालँडमधील फळ उत्पादक एल हॅगचिंग, भैरूसिंग चौहान, यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून ‘यांना’ सन्मानित करण्यात येणार..
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. मागील ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करत व्याधीपासून मुक्त केले आहे. तसेच अरण्यऋषी म्हणून ओळख असलेल्या आणि पर्यावरण आणि वनसंवर्धनात अतुलनीय काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या नावाची यादीः
जोयनाचरण बाचरी (आसाम)
नरेन गुरुंग (सिक्कीम)
डॉ. विलास डांगरे (महाराष्ट्र)
शेखा एजे अल सबाह (कुवैत)
एल हैंगचिंग (नागालैंड)
हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)
भीमसिंग भावेश (बिहार)
राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)
सुरेश सोनी (गुजरात)
व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)
पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)
लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
पंडीराम मांडवी (छत्तीसगड)
जोनास मॅसेट (ब्राझील)
जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)
हरविंदर सिंग (हरियाणा)
कॉलीन गॅटझर (उत्तराखंड)
डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)
सायली होळकर (मध्य प्रदेश)
मारुती भुजगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)
परदेशी नागरिकांचाही सन्मानभैरूसिंग चौहान (मध्य प्रदेश)
व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)
पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)
लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
ह्यू गॅट्डार (उत्तराखंड)
मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)
कोणत्या परदेशी नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे?
1) जोनास मॅसेटः ब्राझिलियन मेकॅनिकल इंजिनियर असलेले आणि हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला आहे. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणातही त्यांनी सुलभता आणली आहे.
2) शेखा एजे अल सबाः कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. यांनी आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आहे आणि शम्स यूथ योगाची स्थापना केली.
श्री: गणेश्वर शास्त्री द्रविड यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे