मुंबई: नवी मुंबतुन काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मंगळवारी तळोजा देवीपाडा येथील दोन वर्षांच्या गायब झालेल्या मुलीचा मृतदेह तिच्याच राहत्या घरामध्ये पोटमाळ्यावर ठेवलेल्या सुटकेसमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज तिच्या मृत देहाचा वास आल्याने ही घटना समोर आली. दोन वर्षांच्या मुलीची हत्या करून घरात बॅाडी लपवली असल्याने नवी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीचं अपहरण कोणी केलं. ही घटना कशी घडली याचा तपास तळोजा पोलीस करत आहेत.