मुंबई: कल्याण पूर्व येथील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नराधम विशालने त्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता आणि त्यानंतर पत्नी व रिक्षाचालक मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आरोपी गवळी मनोरुग्ण नसल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कल्याण पूर्व येथील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. तो अश्याच प्रकरणात कोठडीत होता मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आरोपी गवळी मनोरुग्ण नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय, कल्याण न्यायालय व अन्य रुग्णालयांकडून माहिती मिळवली,मात्र आरोपी मनोरुग्ण असल्याचे दस्तऐवज कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोपी गवळी मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकणी क्षेत्र तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि एसीपी कल्याण घेटे यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसापासून विशाल गवळी मनोरुग्ण असल्याने अनेक गुन्ह्यात समोर आले होते. याचा तपास झाल्यानंतर मात्र आता गवळी हा मनोरुग्ण नसल्याचे समोर आले आहे.