मुंबई: मुंबई मधील मालाड परिसरातुन भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाडच्या खडकपाडा भागातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला कमी असणारी आग काही क्षणात इतरही गोदामांमध्ये पसरली. यामुळे खडकपाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या खडकपाडा भागातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला ही आग खडकपाडा परिसरातील एका गोदामाला लागली होती. मात्र ही आग काही क्षणातच जवळच्या चार पाच गोदामापर्यंत पोहचली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
खडकपाडा परिसरातील लोकांमध्ये भीतीच वातावरण
अधिक माहिती अशी की, फर्निचर च्या गोदमांना लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत. मात्र आग प्रचंड मोठी असल्यामुळे नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे. जिवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. याच बरोबर आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. खडकपाडा परिसरात लोकांची वर्दळ असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.