मुंबई: बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा 45 लाख शेतकऱ्यांना होत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वाधिक म्हणजे 16 हजार मेगावॅट वीज कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार आहे. रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज कोणालाही पडणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
सन 2030 पर्यंत 52 टक्के एवढी वीज ही अपारंपारिक उर्जेतुन तयार होणार आहे. ज्यांच्याकडे डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे, तो सर्वात श्रीमंत आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची वीज आहे. त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला, जाईल असेही फडणवीस म्हणाले.