मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे. फहाद अहमद यांनी नुकतीच पक्षाकडून अणुशक्तीनगरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. त्यांची युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
विधानसभेला सुरुवातीला समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता पक्षाने त्यांची युवक अध्यक्षपदी नियुक्ती करत मोठी जबाबदारी टाकली आहे.
Congratulations #fahad for being appointed as National Youth President of NCP-SP
A lot is expected from u the activist in u should do wonders.
All The Best @FahadZirarAhmad @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/uvTY70nEK2— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 28, 2025
कोण आहे फहाद अहमद?
अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते तेथे युवा आघाडीचे अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा आंदोलनं केली होती.