नवी दिल्ली : घराला स्टायलिश आणि आरामदायी लूक देण्यासाठी आपण अनेक वस्तू घरामध्ये आणतो. त्यात अगदी सोफा, बेड इतकेच नाहीतर शो-केस (कबर्ड) कोणते असावे हेदेखील पाहिले जाते. सोफा सेट हा योग्य पर्याय आहे. कोणत्याही पाहुण्याचं स्वागत करण्यात सोफा सेट खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी घरात ट्रेंडिंग सोफा सेट असणे आवश्यक आहे.
सध्या ऑनलाईनसह ऑफलाईन मार्केटमध्येही सोफा सेट मिळू शकतो. त्यात तुम्हाला Torque – Silvester U Shape चा सोफा आरामदायी वाटू शकतो. कारण, यामध्ये 9 लोकं बसण्याची क्षमता आहे. हा उच्च दर्जाच्या मटेरिअलने बनलेला हा सोफा सेट अतिशय आरामदायक असा आहे. हा सोफा सेट यू शेपमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचा फोम मिळतो, जो अतिशय उच्च घनतेसह अतिशय मऊ असा मिळत आहे.
Adorn India या कंपनीचा HighBack Leatherette सोफा छोटा जरी वाटत असला तरी याची क्षमता 5 लोकं बसण्याची आहे. हा सोफा सेट 4.5 स्टार रेटिंगसह दिसत आहे. हा सोफा सेट टाईट बॅकसह येत आहे. त्याची आसन क्षमता 5 लोकं एवढी आहे, जी घरासाठी योग्य आहे. या अत्याधुनिक सोफ्याचे डिझाईन चांगल्या दर्जाच्या लाकडापासून तयार केले गेले आहे. तुम्हाला हा सोफा अगदी आरामदायी असा वाटू शकतो.