तुमच्या पत्नीसोबतच्या नात्यात प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आपण अनेकदा आपल्या जोडीदाराशी सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलतो, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आपल्या जोडीदाराला कधीही सांगू नये. विशेषत: पतीने काही गोष्टी चुकूनही पत्नीला सांगू नयेत. अशा गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
तुम्ही तुमच्या एक्स गर्लफ्रेंड किंवा तुमच्या पत्नीसोबतच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करणे मूर्खपणाचे ठरू शकते. हे तुमच्यातील भांडणाचे कारण बनू शकते. तसेच तुमच्या पत्नीचे दिसणे, रंग किंवा वजन यावर कधीही नकारात्मक टिप्पणी करू नका. यामुळे तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास दुखावू शकतो. त्यामुळे नातेसंबंधात अंतर निर्माण होऊ शकते. इतकेच नाहीतर जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या शारीरिक वजनाची काळजी वाटत असेल तर तिला अशाप्रकारे सांगा की तिला वाईट वाटणार नाही.
तुमची आई किंवा कुटुंबातील सदस्याशी तुलना करू नका. तुमच्या पत्नीची तुमच्या आईशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी कधीही तुलना करू नका. यामुळे तिच्या भावना दुखावू शकतात आणि घरात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.