आपल्यापैकी काहीजण हे घरच्या घरीच कपड्यांना इस्त्री करत असतील तर काहीजण बाहेर लाँड्रीमध्ये कपडे इस्त्री करत असतील. पण तुम्ही घरीच इस्त्री करत असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. त्यात कपडे इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान योग्यप्रकारे सेट करा. कपड्यांच्या फॅब्रिकनुसार इस्त्रीचे तापमान आहे की नाही हे एकदा तपासून पाहा. नाहीतर कपडे जळण्याचा धोका असू शकतो.
कपडे इस्त्री करताना इस्त्रीला योग्यप्रकारे पॉवर सप्लाय होतो की नाही हे एकदा तपासून घ्या. काहीजण बर्याचदा इस्त्री सॉकेटसह प्लग करतात, ते वायरकडे सहसा लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत इस्त्रीमध्ये स्पार्कमुळे आगीचा धोका असतो. त्यामुळे इस्त्री सॉकेटसह प्लग करताना ते वायरला चिकटणार नाही याची दक्षता घ्या. इस्त्री थेट सुक्या कपड्यांवर चालू नये. असे केल्याने, कापड इस्त्रीला चिकटू शकते. या व्यतिरिक्त, योग्य काळजी घेतली नाहीतर आग देखील पकडली जाऊ शकते. वाळलेल्या कपड्यांवर इस्त्री करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी, हलके ओले किंवा स्टीम अशा कपड्यांवर इस्त्री केल्यास फायद्याचे ठरू शकते.
तसेच इस्त्री नेहमी सपाट आणि स्थिर पृष्ठभागावर वापरली पाहिजे. गुळगुळीत पृष्ठभागामुळे, कपड्यांना योग्यप्रकारे इस्त्री होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे याची काळजी देखील तुम्हाला घेणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इस्त्रीची वायर ही इस्त्रीला चुकूनही चिकटू अथवा स्पर्श करू देऊ नका. याने शॉर्टसर्किटचा धोका अधिक पटीने वाढू शकतो.