सध्या हिवाळा संपून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. वातावरणातही कमालीचा बदल जाणवत आहे. असे असताना एसी, कूलर आणि फॅन यांसारख्या साधनांचा वापर वाढत आहे. तुम्हीही एसीचा वापर करताय तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. वातावरण थंड करण्यासाठी रेफ्रिजरंट एसी आवश्यक असतो. जर रेफ्रिजरंटची पातळी कमी असेल तर एसी व्यवस्थित थंड होऊ शकत नाही. त्यामुळे रेफ्रिजरंट पातळी तपासण्यासाठी एसी टेक्निशियनला माहिती द्यावी.
अनेकदा एसीची म्हणावी तशी हवा आपल्याला मिळत नसल्याने आपण त्रस्त होतो. त्यावेळी काय करावं अन् काय नको हे समजत नाही. तेव्हा एसी रिपेअरिंगपासून ते त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाते. हिवाळ्यात बहुतांश वेळा एसी बंद असतो. त्यामुळे फिल्टरमध्ये धूळ आणि कचरा जमा होऊ शकतो. ज्यामुळे हवेचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे दर दोन आठवड्यांनी फिल्टर स्वच्छ करावा. फिल्टर साफ करण्यासाठी, तो बाहेर काढावा आणि नंतर तो धुऊन कोरडे झाल्यानंतरच एसीमध्ये पुन्हा बसवावा.
तसेच कंडेन्सर युनिट एसीचा एक बाहेरील भाग आहे. कंडेन्सर युनिटच्या सभोवतालची जागा स्वच्छ ठेवा आणि वारा प्रवाह योग्य असल्याचे सुनिश्चित करा. कंडेन्सर युनिटचे स्वीच योग्यरित्या चालू आहे की नाही तेदेखील तपासा. याशिवाय, एसीच्या ड्रेन लाईनमध्ये पाणी जमा होऊ शकते, ज्यामुळे अडथळा येऊ शकतो. ड्रेन लाईन नियमितपणे स्वच्छ करा. ड्रेन लाईन साफ करण्यासाठी पाईप क्लिनर किंवा व्हॅक्यूम क्लिनर वापरा. या पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.