सध्या ChatGPT ने फोटो फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सोशल मीडियावर नवीन फोटो स्टाईल ट्रेंड होत आहेत. Ghibli Style पासून सुरू झालेला हा ट्रेंड आता Barbie Style फोटोपर्यंत पोहोचला आहे. आता प्रत्येकजण ChatGPT च्या मदतीने Barbie Style मध्ये स्वतःचे फोटो बनवत आहे आणि सोशल मीडियावर शेअर करत आहे.
Ghibli च्या पूर्वीही अशाच प्रकारची अॅक्शन फिगर स्टाईल लोकप्रिय झाली होती. Barbie Style देखील यासारखीच आहे. तुम्ही आता असेच फोटो मोफत तयार करू शकता. काही दिवसांपूर्वी लोक ज्या पद्धतीने अॅक्शन फिगर स्टाईलमध्ये त्यांचे फोटो तयार करत होते. लोक आता बार्बी स्टाईलमध्ये असेच काहीतरी करत आहेत. यामध्येही, एआय तुमच्या फोटोच्या फीचर्सशी जुळवून एक बाहुली तयार करते. याशिवाय, तुमच्या डिझाईन केलेल्या बाहुलीच्या बॉक्समध्ये काही वस्तू देखील आहेत, ज्या बार्बीच्या जगातल्या वाटतात.
अशाप्रकारे करता येईल बार्बी स्टाईल फोटो…
– जर तुम्ही फोनवर असा फोटो काढणार असाल तर प्रथम तुमच्या फोनवर ChatGPT इन्स्टॉल करा. जर तुम्ही डेस्कटॉप वापरत असाल, तर OpenAI च्या वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या अकाउंटने ChatGPT मध्ये लॉग इन करा.
– यानंतर तुमचा फोटो जोडा. यासाठी तुम्हाला प्लस आयकॉनवर टॅप करावे लागेल.
– फोटो निवडल्यानंतर, तुम्हाला ChatGPT ला हा प्रॉम्प्ट द्यावा लागेल. काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला फोटो बनवता येणार आहे.