सध्या खाजगी असो वा सरकारी अथवा इतर कोणत्याही कामांसाठी आधारकार्ड हे गरजेचे असते. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. पण, आधारकार्ड हे केवळ वृद्धांसाठी बनवले जात नाही. हे मुलांसाठी देखील बनवले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार 5 वर्षांखालील मुलांना आधारकार्ड जारी करत आहे.
दर पाच वर्षांनी आधारकार्ड अपडेट करण्यासाठी खर्च येतो आणि नंतर त्याला ‘मायनर आधार’ म्हटले जाते. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले जाते. पालकाचे आधारकार्ड त्याला लिंक करण्यात येते. मुलांच्या आधारकार्डमध्ये बायोमेट्रिक डेटा वापरला जात नाही. पण, आता तुमच्या लहान मुलांचे आधारकार्ड बनवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडा. यानंतर तुम्हाला ‘My Aadhar’ टॅबवर क्लिक करावे लागेल आणि ‘Book an Appointment’ पर्याय निवडावा लागेल. यानंतर, ‘UIDAI संचालित आधार सेवा केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करा’ आणि तुम्हाला जिथे अपॉइंटमेंट हवी आहे ते शहर निवडा. शहर निवडल्यानंतर, ‘Proceed to book Appointment’ वर क्लिक करा.
ते तुम्हाला पुढच्या Page वर घेऊन जाईल. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर ‘Get OTP’ वर क्लिक करा. तुमच्या फोन नंबरवर OTP येईल तेव्हा तो एंटर करा आणि भेटीची तारीख निश्चित करा. यानंतर तुम्हाला नियोजित तारखेला आधार केंद्रावर जावे लागेल.