संदिप टूले
पुणे : राज्यस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकथाॅन स्पर्धेचे आयोजन पुणे (ॲमेझॉन सेंटर)येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शेलारमेमाणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेमध्ये १५ जिल्ह्यामधून ५७,६०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला होता. त्यापैकी ४५ विद्यार्थी व १५ शिक्षकांची राज्यस्तरावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती .
या स्पर्धेत १५ जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या १५ संघानी (शाळेनी) सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची संबंधित समस्यांचा विचार करून कोडींगच्या आधारे फिजिकल किट चा वापर करून प्रत्यक्ष प्रोजेक्ट तयार करण्याचा होता त्याकरता बाहेरून कोणतेही साहित्य आणायचे नव्हते सर्व प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वतः बनवायचे होते. या स्पर्धमध्ये जिल्हा परिषद शेलारमेमाणवाडी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी जानवी शिंदे, श्रावणी सावंत,अनन्या शेलार या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता व या विद्यार्थ्यांना अमर खेडेकर, धनश्री पासलकर, अजित लोंढे,सूर्यकांत लडकत,रूपाली कोलते अजिता शेलार या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रत्येक जिल्ह्यातील शाळेने अतिशय उत्कृष्ट असे प्रोजेक्ट बनवले होते.यामधून जिल्हा परिषद शाळा शेलारमेमाणवाडी (मिरवडी) ता. दौंड या शाळेने घवघवीत यश मिळवत राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेत पारितोषक म्हणून शाळेला दोन लॅपटॉप दोन टॅबलेट एक अलेक्सा किट असे बक्षीस मिळाले असून या स्पर्धेच्या माध्यमातून शाळेला तीन लाख रुपये पेक्षा अधिक रकमेची बक्षिसे मिळाली आहेत.या यशाबद्दल ग्रामस्थांकडून शाळेतील शिक्षकांचे व शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.