पुणे : पंचांगानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
आज जुन्या पारंपारिक विचारांचा पगडा तुमच्यावर असेल, त्याप्रमाणे आचरण कराल.
वृषभ
आज जवळचे लोक तुमच्या बाबतीत संभ्रमात पडतील. आर्थिक बाबतीत थोड्या अडचणी निर्माण होतील
मिथुन
आज महिला जास्तच काटकसरी बनतील. धार्मिक गोष्टींकडे कल जास्त वाढेल
कर्क
आज दुसऱ्याला मदत करण्यात अग्रेसर राहाल रुढीप्रिय व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे तुमच्यावर त्यांचा पगडा राहील
सिंह
राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना हव्या त्या माणसांच्या गाठीभेटी पडतील
कन्या
सामाजिक क्षेत्रात मान मिळेल, घरामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय शिरोधार्य मानला जाईल
तूळ
आज फक्त डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवलीत, तर संवाद साधण्यासाठी उपयोगी पडेल
वृश्चिक
जेवढे काम कराल त्या मानाने लाभ हवा तेवढा मिळणार नाही, ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत त्यांनी डॉक्टरांनी सल्ला घ्यावा
धनु
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना स्वाभिमान थोडा बाजूला ठेवावा लागेल, जोडीदाराबाबत नसत्या चिंता करायला
मकर
व्यवसायात पार्टनरच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे, नोकरी धंदा किंवा करिअर बाबत बरीच स्वप्न रंगवाल
कुंभ
आज चिंता करण्याजोगी गोष्ट नसेल, अशाही गोष्टींची चिंता कराल आणि मनस्वास्थ्य हरवून बसाल
मीन
वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, वाङ्मयाचा ज्यांना छंद आहे त्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळतील.