पुणे : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झालं.या सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनावर विरोधकांकडून वारंवार जोरदार टीका केली जात असते. अशातच आता या सत्ताधाऱ्याविरोधात आवाज उठवण्यासाठी राज्यातील तीन बडी नेते पुण्यात एकत्र येणार आहेत.रविवारी पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५ पार पडणार आहे. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार पक्षाचे बच्चू कडु एकत्र येणार आहेत. या परिषदेत ते विरोधी पक्षाची जागा घेणार असून एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणार आहेत.
.पुण्यात रविवारी होणाऱ्या युवा संघर्ष निर्धार परिषदेची “खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार “अशी टॅगलाइन असून या परिषदेतून राज्यातील तीनही बडे नेते सत्ताधाऱ्याविरोधात आवाज उठवणार आहेत. हे तीनही नेते एकत्र येत विरोधी पक्षाची जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.पुण्यात राज्यातील तीन बडे नेते एकत्र येत असल्याने चर्चाना जोर धरला आहे
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख तीन विरोधी पक्ष आहेत. विधानसभेत या विरोधीपक्षाची संख्या ५० इतकी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे २० आमदार, काँग्रेसचे १६ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार तसेच इतर पक्षांचे आमदार मिळून जेमतेम ५० आमदारांची संख्या आहे.त्यात मविआला दुबळा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. दरम्यान या परिषदेतून तीनही नेत्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जाणार आहे.