पुणे : पुढील काळात होऊ घातलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सोडती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील तालुक्यात पुढील काळात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून, यासंदर्भात सरपंच पदाच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी 23 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
23 एप्रिल रोजी प्रत्येक तालुक्यातील असणाऱ्या महत्त्वाची ठिकाणी दुपारी 12: 15 वाजता आरक्षण सोडत म्हणजेच ड्रॉ घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी पुणे ग्रामपंचायत शाखा यांच्याकडील 17 एप्रिल रोजीच्या निर्देशनाने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी ही आरक्षण सोडत होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.