पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांच्या अपहरणाची माहिती समोर आली होती. मात्र आता वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण झालेच नव्हते तर त्यांचा अपघात झाला होता अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वारगेट प्रकरणातील आरोपीचे पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचें अपहरण न होता अपघात होऊन जखमी झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. अपहरण झाल्याची बातमी पसरतात पोलिसांनी तपास केला असता साहिल डोंगरे हे रात्री सागर बार येथे रात्री 10 वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्के सोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. त्यानुसार डोंगरे रात्री 11.30 वाजता व पहाटे 05 वाजता दिवे घाट परिसरात असल्याची माहिती मिळाली.दरम्यान 108/112 या क्रमांकावर सासवड पोस्ट येथील अंमलदारांना कॉल आला होता. पोलिसांच्या कंट्रोल रूमला एकाचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन आला होता. त्यानंतर हा खुलासा झाला.
आरोपीच्या वकिलाचे कोणत्याही प्रकारचें अपहरण झाले नसून त्यांचा रस्त्यावर अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.