मुंबई : दिल्लीत प्रियकराने हत्या केलेल्या श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विकाल वालकर हे मुलगी श्रद्धा वालकरची दिल्लीमध्ये झालेल्या हत्येमुळे धक्क्यात होते. दिल्लीत 2022 मध्ये श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराकडून शरीराचे 35 तुकडे करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. आफताब अमीन पूनावाला असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. आफताबबरोबर प्रेमसंबंध प्रस्तापित होण्यापूर्वी श्रद्धा आपल्या आईवडिलांबरोबर मुंबईमध्ये वसई येथे राहत होती.
दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या
2022 मध्ये दिल्लीत प्रियकराकडून श्रद्धा वालकरची हत्या करण्यात आली होती. ती तिच्या प्रियकर आफताब अमीन पूनावाला हिच्याबरोबर राहत होती. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा साठी विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. सद्या श्रद्धाच्या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. या सर्व गोष्टी करताना विकास वालकर यांची प्रचंड धावपळ होत होती. श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांना चांगलाच धक्का बसला होता, त्यानंतर ते सतत तणावात होते.
श्रद्धा हिच्या शरीराचे तिच्या प्रियकर आफताबकडून 35 वर तुकडे करण्यात आले होते. आफताब हा हत्येनंतर मध्यरात्रीनंतर तो दिल्लीतील विविध भागात हे तुकडे फेकत होता. दिल्ली पोलिसांनी हत्याचा उलगडा केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात आले. तसेच श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे पाहून धक्का बसेल म्हणून, पोलिसांकडून त्यांच्या आईवडिलांकडे ते सोपवण्यात आले नाहीत.
हा सर्व प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आला होता. श्रद्धाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला घेतला आणि देशात खळबळ उडवणाऱ्या हत्याकांडाचा छडा लागला. श्रद्धा हिच्या शरीराचा तुकडे दिल्लीच्या विविध भागांमधून पोलिसांनी गोळा केले. आफताब याने तुकडे छतरपूर जंगला देखील फेकले होते. श्रद्धाची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा देखील जाळण्यात आला होता.
अफताब याला दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या खुनात 12 नोव्हेंबर 2022 मध्ये अटक केली. श्रद्धाचे वडील विकास यांनी आफताब याला फाशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं असून दोषनिश्चितीनंतर खटला सुरू आहे. यातच आता श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.