पुणे : शिक्षणाचे माहेरघर आणि सुसंस्कृत आणि शांतता प्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अचानक वाढलेल्या हाणामारीच्या घटना व दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांचीं संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे पुणे शहर गुन्हेगारांचे ठाण बनलय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे शहरात शंभर दोनशे नव्हे तर तब्बल 21000 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक तळ ठोकून बसले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसावर या कारवाई रोखण्याचा दबाव वाढत आहे त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 21000 गुन्हेगारांची यादी तयार केली. शहरातील दिवसेंदिवस वाढत चालत असलेली गुन्हेगारी यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. नुकत्याच घडलेल्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आता पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.
सध्या पुण्यात कोयता गॅंग सक्रिय आहे. पुण्यातील उपनगरांच्या परिसरामध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे त्याच्यातील काही जनावर आत्तापर्यंत कारवाई झाली आहे मात्र टोळीतील गुंड अजूनही पुण्यातील रस्त्यावर दहशत निर्माण करताना दिसत आहेत. पुण्यातील गुन्हेगारीचा विस्तार हा वाढताना पाहायला मिळत आहे खून, जबरी चोरी, मारहाण,खंडणीखोरी बरोबरच अत्याचार, सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शांतता प्रिय अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच तळ म्हणून पुण्याची नवीन ओळख निर्माण होते का? अशी शंका आता पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.