पुणे : इंडियाज गॉट लेटेंट या शोवरून सुरू असलेल्या वादात विनोदी कलाकार समय रैनाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. महाराष्ट्र सायबर सेलकडून समय रैनाला पुन्हा एकदा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे .येत्या 19 मार्चपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास समय रैनाला सायबर सेलकडून सांगण्यात आल आहे.
इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं समय रैना, रणवीर अलाहाबादियासह 30 ते 40 जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या 1 ते 6 भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या सहभागाची पडताळणी सुरू आहे. दरम्यान यापूर्वी युट्युबर समय रैना याने परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागानं फेटाळून लावली आहे.येत्या 19 मार्च रोजी जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलनं समय रैनाला नवं समन्स पाठवलं आहे.
यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी समय रैना आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर न राहिल्याने त्याला महाराष्ट्र सायबर सेलकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आल आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पॉडकास्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत युट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्मवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित करण्यास मनाई केली आहे.