पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावला आहे. केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(i) आणि कलम 47 A(1)(c) अंतर्गत ७५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तर पंजाब अँड सिंध बँकेला 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचा ग्राहकांना किती फटका बसणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेने नो युवर कस्टमर (केवायसी) नियमांचे योग्यरित्या पालन केले नाही, ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, बँकेने काही ग्राहकांना एकच युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी अनेक ग्राहक आयडी जारी केले होते. जे आरबीआयच्या नियमांविरुद्ध आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी दोन्ही बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली