पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होतं. या आंदोलनाला अखेर यश आल असून मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
एमपीएससीने आज बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास साडे सात हजार उमेदवार बसले होते. उमेदवार गेले दोन दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अखेर एमपीएससीने नव्या तारख्या जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे
दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्व तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाले आहेत. उमेदवाराकडून प्राप्त निवेदन तसेच इतर बाबींचा विचार करून प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27,28,29 मे या कालावधीत घेण्यात येईल.
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या ?
1. मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलाव्या
2. अ राजपत्रित परीक्षेत पदांची संख्या वाढवावी
3. PSI, STI, ASO, SR या पदांची संख्या वाढवावी
4. SEBC-EWSच्या निकालातील चुकांविरोधात आंदोलन