पुणे : पुणे महापालिकेकडून सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले होते. त्यासाठी धोरणाचा आराखडा तसेच नियोजन करण्यासाठी संभाव्य नावाची यादी तयार करण्यात आली आहे. या नावांमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त आणि प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. यांच्या नावानंतर महाराष्ट्रात मोठा वाद पेटला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने महापालिकेचे सांस्कृतिक धोरण स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवल आहे . त्यामुळे भविष्यात या धोरणाचा प्रस्ताव विभागाकडून अभ्यासाअंती पुन्हा नव्याने तयार केला जाईल असं अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले आहे .
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणाच्या सल्लागार समितीत नाव असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं.त्यामुळे सरकारकडून त्यांना राजाश्रय दिला जात असल्याचा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. हा वाद पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेने सावध पावले उचलत अद्याप हे धोरण तयार झालेले नाही. तसेच जी नावे आहेत त्यावर चर्चा करून नमूद केली आहेत असे स्पष्ट केलं होतं. सध्या राजकीय वातावरण तापलेलं असल्यामुळे महापालिकेने या धोरणाचा प्रस्तावच रद्द केला, प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याने आता पुन्हा नव्याने या विभागाकडून प्रस्ताव तयार केला जाईल, त्यानंतर स्थायी समितीवर ठेवला जाईल असे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान या धोरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर कोणतीही पूर्वकल्पना न देता सादर केल्याने महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे या धोरणाची कोणतीही समिती नेमली नसल्याचं जाहीर पत्रकाद्वारे कळवण्यात आलं.