पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीची मालिका संपता संपेना. पिंपरी चिंचवडमधल्या सानेचौक सिद्धी पार्क ते मनपा शाळेदरम्यान अज्ञात टोळक्याकडून सात ते आठ वाहनांची तोडफोड करण्यात आलिया आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या या वाहनांवर लोखंडी रॉड, कोयता हल्ला करुन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवडमधल्या सानेचौक सिद्धी पार्क ते मनपा शाळेदरम्यान रात्रीच्या सुमारास रस्त्यांलगत गाड्या पार्क केलेलया असतात. त्याच गाड्यांना फोडण्याचं काम काही अज्ञात टोळक्यांकडून करण्यात आले आहे. जवळपास सात ते आठ वाहनांच्या काचा फोडल्या आहे. लोखंडी रॉड आणि कोयत्याने त्यांनी वाहनांना लक्ष्य करून गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.
अजित पवारांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांच्या आणि उपक्रमांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. एवढ्या सोयीसुविधा देऊनही, नवे आयुक्तालय करूनही गुन्हेगारी आटोक्यात का येत नाही? असा सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आला होता.