पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेने वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली असून त्याच्या मित्र-मैत्रिणींशी चौकशी केली आहे. त्यावेळी एका मैत्रिणीने भोर पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक आहे. माहिती दिलेली मैत्रीण ही तरुणी आणि दत्तात्रय गाडी याची मैत्रीण होती. चौकशीत तिने असं सांगितले की, आरोपी हा तिच्याबरोबर जुळवून दे आणि मला तिची भेट घालून दे असं सांगून मला वारंवार फोन करायचा असा खुलासा सांगितला.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीच्या मैत्रिणीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार आरोपीची खडानखडा माहिती समोर येत आहे.
त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. त्यातून धक्कादाय खुलासे समोर येत आहेत.
प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथके कामाला लागले आहेत.. दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊन शकतो, या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची ही पथकडे चारही बाजूंना रवाना करण्यात आली आहेत. त्यानुसार त्याच्या मूळच्या शिरूर गावी ही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.