पुणे : पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराशेजारी असलेल्या दर्ग्यात सुरू असलेली अजान बंद करावी अशी मागणी केली. तसेच तिथे असलेल्या भाविकांबरोबर हुज्जत घातल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संस्थेने केला आहे. या आरोपानंतर आता स्वतः मेधा कुलकर्णी यांनी आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा मी गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल असं खुलं आव्हान त्यांना दिल आहे.
नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत बोलताना त्या म्हणाल्या, हनुमान जयंतीच्या दिवशी मी रस्त्यावर होते ते संबंधित व्हिडिओच्या चित्रीकरणांमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दर्ग्यात जाण्याचा प्रश्नच नाही. हनुमान जयंती असल्याने आम्ही तिथे दर्शनासाठी आलो होतो. अजानचा आवाज कमी करावा असं त्यांना फक्त सांगितलं त्यामुळे हुज्जत घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे संबंधित संस्थेने सर्व केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावे ,अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याच कुलकर्णी यांनी स्पष्ट केल आहे.सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या काही नागरिकांशी हुज्जत घातल्याचा आहे.
दरम्यान याआधी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय असल्याच म्हटल आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे अशी टीका त्यांच्यावर केली आहे.