उरुळी कांचन : शिरुर- हवेली विधानसभेच्या मतमोजणीत स्वतःच्या शिरुर तालुक्यात २६ हजार ८२६ मतांनी पिछाडीवर असलेले विद्यमान आमदार अशोक पवार यांची हवेली तालुक्यात पीछेहाट झाली आहे. तर प्रतिस्पर्धी असलेले माऊली कटके यांच्या एकट्या वाघोली गावाने तब्बल २० हजार ५९९ मतांनी मताधिक्य दिले आहे. तर प्रदिप कंद यांचा बालेकिल्ला असलेल्या पेरणे -वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात माऊली कटकेंचा विजयी रथ ७ हजार ५०० मतांनी पुढे आहे.
शिरुर-हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी हवेली तालुक्यात जोरदार मुसंडी मारली आहे. अहिल्यानगररस्त्यावरील ११व्या फेरीत लोणीकंद, पेरणे, वाडे – बोल्हाई गटात साधारण ७ हजार ५००, तर माऊली कटके यांच्या वाघोली गावात २० हजार ५९९ चे मताधिक्य मिळाले आहे. अजूनही उर्वरीत ७ फेऱ्या बाकी असून माऊली कटकेंचा विजयी रथ चांगलाच दौडत असल्याची चिन्हे दिसत आहेत.