लोणी काळभोर : एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात घडली असून शुक्रवारी (ता.21) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अभिजीत ज्ञानेश्वर कुलकर्णी (वय – 45, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभिजीतच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत कुलकर्णी हे आईवडिलांसोबत एमआयटी परिसरात राहतात. अभिजीत हा लागेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. दरम्यान, अभिजीत हा नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.20) रात्री झोपण्यासाठी खोलीत गेला होता.
शुक्रवारी सकाळी अभिजितच्या आईने त्याला उठविण्यासाठी दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने घराचा दरवाजा तोडला असता, अभिजीत हा साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी अभिषेकला नागरिकांच्या साहाय्याने खाली काढले व उपचारासाठी लोणी काळभोर परिसरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र अभिषेकचा मृतदेह उपचारापूर्वीच झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. अभिषेकने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नीलेश कोल्हे करीत आहेत.