पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचार घटनेप्रकरणी राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक झाला आहे. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सुमोटो याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर थेट राज्याच्या पोलिस महसंचालकाना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून ही केस फास्टट्रॅक वर चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच या येत्या तीन दिवसात याबाबतचा अहवाल देण्यास सांगितल आहे.
या घटनेबाबत बोलताना पुढे त्या म्हणाल्या, महिला सुरक्षाबाबत सर्व सरकारी यांना निर्देश देणे गरजेचे आहे. पुणे शहर उत्तम आहे मात्र एका घटनेमुळे पुणे शहराकडे बोट दाखवणे योग्य होणार नाही.दरम्यान पुण्यातील घटनेबद्दलची सविस्तर माहिती देत त्यांनी पुढील गोष्टी पोलिसांच्या रिपोर्ट नंतर ठरवता येतील असं सांगितलं. या प्रकरणातील पीडित महिलेची सुरक्षितता आणि तीचे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी उत्तम तपास करायला हवा आणि ते करत आहेत. आतापर्यंत 23 सुरक्षारक्षकांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.या सगळ्या घटनेकडे राष्ट्रीय महिला आयोग लक्ष ठेवून असल्याचही त्यांनी सांगितलं.
पुण्यातील या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याआधीही पुण्यात काही घटना घडल्या खरं आहे. परंतु यामुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. जिथ महिलांची सुरक्षा असेल तिथे आपण लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण विषयात राष्ट्रीय महिला आयोग काम करेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं