उरुळी कांचन : सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका 24 वर्षीय विवाहित महिलेने सासरच्यांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिच्या पतीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 16 नोव्हेंबर 2022 ते 5 मार्च 2023 रोजी घडली आहे.
शितल राहुल देशमाने (वय 24, रा. तुपेवस्ती, इरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे तक्रार दिलेल्या महिलेचे नाव आहे. तर राहुल भाऊसाहेब देशमाने, (रा. प्लॉट नं. 74, कोलहेष्वरीनगर तपोवन रोड, सुदर्षन अपार्टमेन्ट समोर, ता. जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शितल देशमाने यांचा विवाह आरोपी राहुल भाऊसाहेब देशमाने (रा. कोल्हेश्वरीनगर, तपोवन रोड, अहिल्यानगर) याच्यासोबत झाला होता. विवाहापूर्वी राहुल हा तलाठी असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
विवाहानंतर सासरच्या मंडळींनी वारंवार पैशाची व महागड्या वस्तूंची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच सासऱ्यानेही गैरवर्तणूक केली आणि अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, 5 मार्च 2023 घरातुन हाकलुन देताना सासरच्या लोकांनी अंगावरील सोन्याचे दागिने, स्त्रीधन छोटे मनी मंगळसूत्र, गंठण, नेकलेस कानातले व जोडवी असे काढुन घेऊन घरातुन हाकलुन दिले. तसेच सासरच्यांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला. याप्रकरणी त्यांचेविरुध्द उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगडे करत आहेत.